शिवसेनेकडून 100 दिवसांच्या कामांचा ट्रेलर ‘लॉन्च’, पिक्चर अभी बाकी है.. (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून आयोध्यासाठी रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे आज सहकुटुंब अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याचं आयोजन केले आहे. त्याच्याबरोबर मंत्र्यांसह अनेक शैवसिनिक असणार आहेत. त्याचबरोबर १०० दिवसातील कामाचा लेखाजोखा मांडणारा व्हिडीओही रिलीज करण्यात आला आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. शिवसेनेने १११ सेंकदात १०० दिवसांच्या कामांचा लेखाजोखा मांडला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, सर्वसामान्यांना शिवभोजन थाळी, यांसह राज्यात सुरू असलेल्या विकास कामांची झलक या व्हिडीओच्या माध्यमातून दाखविण्यात आली आहे. त्याचबरोबर पिक्चर अभी बाकी है… असेही या व्हिडीओत म्हटले आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेनं या व्हिडीओत आपल्या सहकारी पक्षांचेही कौतुक केलंय. त्यामुळेच हे शक्य झाल्याचं या व्हिडिओ मध्ये म्हणले आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यादिवशी शिवसेनेकडून महाविकास आघाडी सरकारची ही चित्रफित प्रदर्शित करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लखनौला जाऊन आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी या दौऱ्यासाठी संपूर्ण सहकार्य करू असे आदित्यनाथ यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी राज्य अतिथीचा दर्जा दिला आहे.