Coronavirus : पिंपरीत 24 तासात 11 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरात गेली २४ तासात ११ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये चार पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. शहरातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांचा आकडा 68 वर पोहचला असून आजपर्यंत 96 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 29 जण कोरोनामुक्त झाले असून चौघांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने रविवारी (दि. 26) 116 जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट आज सायंकाळी आले आहेत. त्यामध्ये पिंपरीगावातील चार जण, रुपीनगरमधील दोन आणि काळेवाडी फाटा येथील एक अशा सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. त्यामध्ये 33 आणि 77 वर्षीय दोन पुरुष आणि 12, 17, 18, 40, 40 वर्षीय पाच महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात 8 एप्रिल पासून दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन , 12 एप्रिलला पाच, 13 एप्रिल रोजी दोन, 14 एप्रिल रोजी एकाच दिवशी सहा, 15 एप्रिल रोजी चार, 16 एप्रिल रोजी चार, 17 एप्रिल रोजी दोन, 18 एप्रिल रोजी सात, 19, 20, 21 एप्रिल रोजी प्रत्येकी एकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. 22 एप्रिल रोजी तीन, 23 एप्रिल रोजी तीन रुग्ण, 24 एप्रिल रोजी एकाच दिवशी 11 रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामध्ये आज 25 एप्रिल रोजी दोन, 26 एप्रिल रोजी एक आणि आज 27 एप्रिल रोजी सकाळी चार आणि सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मागील वीस दिवसात तब्बल 71 नवीन रुग्णांची भर पडली आहे.