बोगस रेशनकार्ड बनविणाऱ्या दलालावर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – बोगस रेशनकार्ड बनवून देणाऱ्या देहूगाव येथील एका दलालावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन महादेव पडाळघरे (40, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर धनंजय ऊर्फ धनराज चव्हाण (रा. देहूगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशनिंग ऑफिसमध्ये ओळख आहे, तुमचे काम लगेच करून देतो, असे आरोपी याने फिर्यादी यांना सांगितले. त्यासाठी एक हजार दोनशे रुपये रोख, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड झेरॉक्स, पत्नीचे पॅनकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, लग्नपत्रिका, जुन्या शिधापत्रिकेची झेरॉक्स अशी कागदपत्रे आरोपीने फिर्यादी यांच्याकडून घेतली. त्यानंतर सुमारे 10 दिवसांनी फिर्यादी यांना नवीन केशरी रंगाची शिधापत्रिका दिली.

नवीन शिधापत्रिकेवर धान्य मिळावे म्हणून चौकशी करण्यासाठी फिर्यादी निगडी येथील धान्य पुरवठा खात्याचे परिमंडळ कार्यालय, ‘अ’ विभाग येथे गेले. आरोपी याने दिलेली शिधापत्रिका बोगस असल्याचे त्यावेळी निदर्शनास आले. तपास निगडी पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/