Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिकच घातक ठरताना दिसत आहे. पुण्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात एकाच बेडवर तीन रुग्णांना उपचार देण्याची वेळ आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकार निर्बंध आणखी कडक करण्याच्या विचारात आहे. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड शहरात देखील चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आही. शहरात रुग्ण वाढीबरोबरच रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 2872 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड माहानगरपालिका वैद्यकिय विभागाने दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) दिवसभरात शहरात 2529 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 77 हजार 934 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2872 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 53 हजार 610 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 22 हजार 007 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 54 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 32 रुग्ण शहरातील आहेत. तर 22 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3297 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2317 तर हद्दीबाहेरील 980 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण सांगवी, काळेवाडी, रुपीनगर, चिंचवड, पिंपळे गुरव, मोशी, चिखली, भोसरी, संत तुकारामनगर, आकुर्डी, पिंपरी, मोरवाडी, वाकड, काळेवाडी, चिंचवड, जाधववाडी, निगडी, हाडपसर, पिसोळी, खेड, कुरुळी, लोहगाव, पुणे, धानोरी, बालेवाडी, कोंडवा, अहमदनगर, तळेगाव डमडेरे येथील रहिवाशी आहेत. पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाने सांगितले की, आधी मृत झालेल्या केसेस आज कळवण्यात आल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. गेल्या 24 तासा 13 मृत्यू झाले आहेत.