Pimpri-Chinchwad Corporation | कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना PCMC देणार 10 हजारांऐवजी 25 हजारांची मदत

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri-Chinchwad Corporation | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (Pimpri-Chinchwad Corporation) एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना आत्मनिर्भरच्या हेतूने अर्थसाहाय्य (Financing) देण्याचे नियोजन केले आहे. नागरवस्ती विभागाकडील (Urban Settlement Department) विधवा अर्थसाहाय्य योजनेत 10 हजार रुपयांऐवजी आता 25 हजार रुपये (25 thousand rupees) इतके अर्थसाहाय्य देण्याचे पालिकेनं ठरविले आहे. पालिकेच्या नागरवस्ती विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे अशा संकटात महिलांना एक दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) नागरवस्ती विकास योजना (Nagarvasti Vikas Yojana) विभागाकडून महिला आणि बालकल्याण योजनेअंतर्गत महिलांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना नागरवस्ती राबविल्या जातात. त्या अनुषंगाने विधवा महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विधवा अर्थसाहाय्य योजनेतून 10 हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. त्यात 15 हजार रुपयांनी वाढ करून साधारण 25 हजार इतके अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. असा निर्णय घेण्यात आला आहे.

Governor Bhagat Singh Koshyari | शरद पवारांच्या टीकेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

यासाठी लागणारे कागदपत्र –

– अर्जदाराने अर्जासोबत आधार कार्ड जोडावे, मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादीची प्रत या दोन्हीपैकी एक पुरावा जोडावा.

– पतीच्या मृत्य दाखल्याची प्रत जोडावी. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पतीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे.

– कुटुंबाचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपर्यंत असल्याबाबतचा तहसीलदारांचे उत्पन्नाचा दाखला अथवा रेशन कार्डची प्रत जोडावी.

– अर्जदार महिलेचे वय 50 पर्यंत असावे.

– अर्जदार महिलेने यापूर्वी विधवा अथवा घटस्फोटित महिलांनी किरकोळ स्वरूपाचा व्यवसाय करण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला असल्यास अशा महिलांना लाभाची रक्कम 15 हजार रुपये मिळेल.

दरम्यान, मागील दीड वर्षपासून येऊन ठेपलेल्या कोरोनामुळे (Corona virus) अनेक लोक हतबल
झाली आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील अनेक लोकांना नुकसान सोसावे लागले. अनेकांनी
आपला कर्ता गमावला. मागील वर्षांपासून जवळपास 4 हजार 354 जणांचा कोरोनाने बळी गेला
आहे. मात्र सध्या शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, त्तज्ज्ञांकडून कोरोनाही तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे.

हे देखील वाचा

Shrimant Kokate | ‘पुणे कोणाच्या बापाचं नाय’ हे मनसेनं लक्षात ठेवावं’

PM Modi Temple Pune | पुण्यातील ‘मोदीभक्ता’नं उभारलं PM नरेंद्र मोदी यांचं मंदिर (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pimpri-Chinchwad Corporation | PCMC will provide financial assistance of rs 25000 to women who have been widowed due to corona

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update