Pimpri Chinchwad Editors Guild Awards | ‘पिंपरी चिंववड एडिटर्स गिल्ड’कडून ‘लोकशाही मराठी’चे संपादक कमलेश सुतार, न्यूज 18 लोकमतचे गोविंद वाकडे, न्यूजस्टेट महाराष्ट्रच्या अश्विनी सातव-डोके यांच्यासह राज्यातील 12 ज्येष्ठ पत्रकारांचा राज ठाकरेंच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पिंपरी/निगडी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्ड (Pimpri Chinchwad Editors Guild) च्या वतीने पत्रकार हल्ला विरोधी व कायदा परिषद (Anti-Journalist Assault and Legal Council) व पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यतील पत्रकारांचा गौरव मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर (Sr Journalist Avinash Chilekar) होते. (Pimpri Chinchwad Editors Guild Awards)

या परिषदेत सुरुवातीला झालेल्या चर्चासत्रात बोलताना मंदार फणसे (Mandar Phanse) म्हणाले की पत्रकारांनी सत्तेला प्रश्न विचारले पाहिजेत. सध्या राजकीय पक्ष व राजकीय नेत्यांच्या झुंडी तयार झाल्या असून त्या पत्रकारितेवर हल्ला करत आहेत. आपली अराजकतेकडे वाटचाल चालली असल्याचे सांगत ते म्हणाले की, देशाचे अर्थकारण सुधारले नसल्याने प्रसार माध्यमं पारतंत्र्याकडे चालली आहेत. (Pimpri Chinchwad Editors Guild Awards)

कमलेश सुतार (Kamlesh Sutar) यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, आज आपण त्याग केला नाही तर पुढच्या दोन पिढ्यांचे गुन्हेगार ठरवू त्यामुळे आता पत्रकारितेवर हल्ले जरी झाले तरी आपल्याला काही त्याग केलाच पाहिजे.

संजय आवटे (Sunjay Awate) यावेळी म्हणाले की, सध्या माध्यमांचे मोठ्या प्रमाणात लोकशाहीकरण झाले आहे त्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं माध्यम सुरू करू शकता हे यापूर्वी शक्य नव्हते या नव्या संधीचा लाभ घेत नव्या पत्रकारांनी या क्षेत्रात आले पाहिजे.

सम्राट फडणीस (Samrat Phadnis) यांनी यावेळी बोलताना म्हणाले की, पत्रकारिता म्हणजे समाजातील तळाचा आवाज आहे. पूर्वीची पत्रकारिता व आजची पत्रकारिता यात फरक आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi), डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr.  Babasaheb Ambedkar) यांच्या काळात पत्रकारिता व्यवसाय नव्हता. आता याला व्यवसायाचे स्वरूप आले आहे. मात्र याबाबत आपण बोलायला लाजत आहोत. आपण जर पत्रकारितेतील व्यवसायिकता शिकलो नाही तर या क्षेत्रात काम करणाऱ्यांना कमी मोबदला देऊन आपण त्यांची फसवणूक करणार आहोत.

या चर्चासत्रात सुनील माळी अविनाश थोरात अमित मोडक यांनीही आपली मते मांडली. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन शितल पवार व नाना कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे (MP Srirang Barane), नगरसेवक नाना काटे (Nana Kate), मनसेचे शहर प्रमुख सचिन चिखले (Sachin Chikhle), माजी उपमहापौर राजू मिसाळ (Raju Misal), मारुती भापकर, आदींसह अनेक पत्रकार उपस्थित होते.

यावेळी कमलेश सुतार (संपादक-लोकशाही मराठी, अनिल मस्के (संपादक- दै. पुण्यनगरी),
अमित मोडक (पत्रकार-डीजिटल मीडिया), संदीप महाजन (पत्रकार), अविनाश खंदारे
(दै. लोकमत, यवतमाळ), अश्विनी सातव-डोके (असो.एडिटर – न्यूजस्टेट महाराष्ट्र),
 नितीन पाटील (संपादक – www.policenama.com), आशिष देशमुख (दै. पुढारी, पुणे),
महेश तिवारी (न्यूज 18 लोकमत, गडचिरोली),
गोविंद वाकडे (न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड) आदिंचा निर्भीड पत्रकारितेबद्दल राज ठाकरे
यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत जाधव,
उपस्थितांचे स्वागत किरण जोशी व आभार प्रदर्शन गोविंद वाकडे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कातळे व अमृता ओंबळे यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी