Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 171 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरात मागील काही दिवसांपासून नविन रुग्णांची (Pimpri Corona) संख्या दोनशेच्या आत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 171 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 171 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Corona-infected patients) संख्या 2 लाख 69 हजार 758 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 111 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 64 हजार 258 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 1361 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 1361 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
आज दिवसभरात शहरात पूर्वी मृत्यू झालेल्या 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4399 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 19,242 हजार जणांना लस

बुधवारी (दि.1) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड -19 लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 19 हजार 242 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 14 लाख 75 हजार 504 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 171 new patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | अलिशान गाडी स्वस्तात देण्याच्या बहाण्याने उकळले 43 लाख, 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

Air pollution | रिपोर्टमध्ये झाला आश्चर्यकारक खुलासा ! वायु प्रदूषणामुळे भारतातील लोकांचे वय होतंय 9 वर्षांनी कमी


PMRDA | पीएमआरडीएच्या विकासआराखड्यावर आतापर्यंत 26 हजार हरकती