Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 85 नवीन रुग्णांची नोंद, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Chinchwad Corona) दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली असून बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही (Pimpri Chinchwad Corona) वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 085 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 04 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 085 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 67 हजार 253 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 89 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 61 हजार 929 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरामध्ये सध्या 946 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून यामध्ये 2 शहरातील तर शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4378 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 17,204 जणांचे लसीकरण

सोमवारी (दि.16) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 17 हजार 204 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 12 लाख 45 हजार 071 जणांना लस देण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Afghanistan Crisis | अफगाणिस्तान सोडण्याची घाई पडली महागात, उडणार्‍या विमानातून पडले तीन लोक, टायर पकडून लटकले होते (व्हिडीओ)

Sharad Pawar | शरद पवार यांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

Pune Police | चोरीच्या गुन्ह्यातील जप्त केलेल्या वस्तूंचा पुणे पोलिसांकडून लिलाव

BHR Scam | बीएचआर घोटाळा ! भाजपचे आमदार चांदूलाल पटेल यांचा अटक पूर्व जामीन मंजूर

 

बाप तो बाप असतो ! राज ठाकरेंबद्दल चुकीचे शब्द वापराल तर पुणे शहरात फिरून देणार नाही…