Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 37 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांच्या (Recover patient) संख्येत चढउतार पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 34 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज (Pimpri Corona) दिवसभरात शहरात 3474 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 34 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 697 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 37 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 72 हजार 487 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात 442 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 442 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेल नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4499 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 13,666 जणांचे लसीकरण

शुक्रवार (दि.12) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Corona) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 13 हजार 666 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 23 लाख 86 हजार 354 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | Discharge of 37 patients of Corona in Pimpri Chinchwad, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा