Pimpri Corona | चिंताजनक ! पिंपरी चिंचवड शहरात 11 दिवसात 1 हजार मुलांना ‘कोरोना’ची लागण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने शहरातील शाळा बंद (School Close) केल्या आहेत. तर शाळा सुरुच ठेवा, अशी मागणी एका वर्गाकडून केली जात आहे. मात्र, दुसरीकडे शहरात मागील 11 दिवसात तब्बल 1 हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण (Corona Infection) झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शाळा सुरु करा अशी मागणी करणाऱ्या पालकांनी ही आकडेवारी लक्षात घेणे गरजेचं आहे. मुलांना कोरोनाची लागण (Pimpri Corona) होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाची लागण झालेल्या एकूण मुलांपैकी केवळ चार मुलंच पालिकेच्या रुग्णालयात (Municipal Hospital) दाखल असून त्यांना सौम्य लक्षणे आहेत. उर्वरित मुले गृह विलगीकरणात असून अनेकजण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

पिंपरी चिंचवड शहरात मागील 11 दिवसामध्ये 1023 मुलांना कोरोनाची लागण (Pimpri Corona) झाली आहे. कोरोनाची बाधा झालेल्या 0 ते 5 वयोगटातील 166 मुलांचा समावेश असून बहुतांश पालकांच्या संपर्कात आले आहेत. तर 6 ते 18 वयोगटातील 857 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. सुदैवाने महापालिकेने लहान मुलांसाठी राखीव ठेवलेल्या जिजामाता रुग्णालयात (Jijamata Hospital) केवळ चार मुलं दाखल झाली आहेत.

तारीख       0 ते 5        6 ते 18     एकूण
1 जानेवारी      2              10             12

2 जानेवारी      3              16             19

3 जानेवारी      0              15             15

4 जानेवारी      6              35             41

5 जानेवारी     10             55             61

6 जानेवारी     16             75             91

7 जानेवारी     28            114            142

8 जानेवारी     16            115            131

9 जानेवारी     23           166            189

10 जानेवारी   32           115            147

11 जानेवारी   30           141             171

 

Web Title :-  Pimpri Corona | Near about one thousand children infected with covid in pimpri chinchwad PCMC

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा