Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 165 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Chinchwad Corona) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 165 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद (Pimpri Chinchwad Corona) झालेली नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 165 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 63 हजार 471 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 58 हजार 076 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1 हजार 062 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
यामध्ये 02 रुग्ण शहरातील आहेत. तर 02 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4333 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी (दि.25) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 7 हजार 692 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 9 लाख 77 हजार 883 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title :- Pimpri Corona | Pimpri Chinchwad middle Galya 24 Tasat ‘Corona’ from 165 newly sick, Janoon Gya other figures

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bank Customers Alert | ‘ही’ 11 Android App तुमच्या बँक अकाऊंटला करतील रिकामे, तात्काळ करा ‘डिलीट’, जाणून घ्या यादी

SBI नं दिली नवीन माहिती ! डेबिट कार्ड हरवले किंवा डॅमेज झाल्यास कार्ड ब्लॉक करण्याची सांगितली पद्धत, जाणून घ्या (व्हिडीओ)

Gold Price Today | सोन्याच्या दरात 2000 रूपयांपेक्षा जास्तीने ‘घसरण’, चांदी झाली 5739 नं ‘स्वस्त’; जाणून घ्या पुढं कसा राहिल ट्रेंड