Pimpri Corona Updates | चिंताजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1200 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) 1276 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरात रुग्ण वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या साडेसहा हजाराच्या वर गेल्याने चिंता वाढली आहे.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 10 हजार 364 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1276 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Updates) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 86 हजार 213 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 230 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 75 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 6694 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 425 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6269 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरामध्ये आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :-  Pimpri Corona Updates | Worrying More than 1200 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune First | अग्रेसर पुण्यासाठी ‘पुणे फर्स्ट’ उपक्रम – सभागृह नेते गणेश बिडकर यांची माहिती

 

Ramdas Athawale | ‘शिवसेना-भाजपनं एकत्र यावं आणि फडणवीसांना मुख्यमंत्री करावं’ – रामदास आठवले

 

शेतकर्‍यांना मिळू शकते का e-SHRAM Card, जाणून घ्या ई-श्रम पोर्टलचे नियम

 

Advocate Gunratna Sadavarte | ‘एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी पवारांकडे कशाला जाता, ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का?’