Ramdas Athawale | ‘शिवसेना-भाजपनं एकत्र यावं आणि फडणवीसांना मुख्यमंत्री करावं’ – रामदास आठवले

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ramdas Athawale | राज्यात मागील दोन वर्ष झाली भाजप आणि शिवसेना युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने (Shiv Sena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसची (Congress) हात मिळवत सत्ता स्थापन केले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांत अनेक मुद्द्यावरुन राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळते. दरम्यान, शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) यांच्या युतीबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

‘राज्यात पुन्हा शिवसेना आणि भाजपनं एकत्र यावं असं मत रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद या फॉर्म्युल्याप्रमाणं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मुख्यमंत्रीपद द्यावं,’ असं आवाहन देखील आठवले यांनी शिवसेनेला केलं आहे.

ADV

‘राज्यात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री आहेत, पण त्यांची प्रकृती ठीक नाहीये.
त्यामुळे मध्यंतरी अशी चर्चा होती की, उद्धव ठाकरेंऐवजी इतर कोणाला तरी शिवसेनेतून मुख्यमंत्री बनवावं. माझं म्हणणं असं आहे की, इतरांना कोणाला मुख्यमंत्री बनवण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवावं आणि अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा जो शिवसेनेचा फॉर्म्युला होता, त्याप्रमाणं पुन्हा शिवसेना-भाजपनं एकत्र यावं आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न करावा, असं माझं उद्धव ठाकरेंना आवाहन आहे,’ असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title :- Ramdas Athawale | shivsena bjp should come together fadnavis should be made cm says union minister ramdas athawale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Advocate Gunratna Sadavarte | ‘एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी पवारांकडे कशाला जाता, ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का?’

 

Pune Crime | पुण्यात नोकरी गेल्यानं ‘जीवरक्षक’ तरूणाची आत्महत्या, मुंढव्याच्या केशवनगरमधील घटना; जाणून घ्या कारण

 

Pune Crime | पुण्यात मसाज करण्यासाठी आलेल्या तरुणीबरोबर केले अश्लिल कृत्य; डेक्कन जिमखान्यावरील हेअर आर्टच्या कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल