2 पिस्तूल, 4 राऊंड जप्त, गुन्हे शाखा 3 ची कामगिरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – सापळा रचून अटक केलेल्या गुन्हेगाराकडून बेकायदेशीर दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त केला. हि कारवाई भांबोळी चौक येथे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने केली आहे.

गणेश श्रीमंत चव्हाण (२३, रा. देहूगाव) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण परिसरात युनिट तीनचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी एक जण बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कर्मचारी सागर जैनक यांना मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त आर.आर. पाटील, श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक निरीक्षक सतीश कांबळे, कर्मचारी विठ्ठल सानप, गंगाधर चव्हाण, हजरत पठाण, दादा पवार, सचिन मोरे, योगेश्वर कोळेकर, जमीर तांबोळी, सागर जैनक यांच्या पथकाने सापळा रचला.

संशयित सागर त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन बेकायदेशीर पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. अधिक चौकशी केली असता ती विक्रीसाठी आणली असल्याचे समोर आले. तपास पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/