मुलीला त्रास देणाऱ्या जावयाची जोरदार ‘धुलाई’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – मुलीला जावई त्रास देत असल्याने चिडलेल्या सासू-सासऱ्याने घरी येऊन जावयाची जोरदार धुलाई केली. यामध्ये जावयाच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले असून पोलिसांकडे तक्रार दिली आहे. हा प्रकार देहूरोड, गारमाळ, धायरी येथे २५ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या घडली.

या प्रकरणी आकाश यशवंत जालगी (३१, रा. गारमाळ धायरी) यांनी फिर्याद दिली. तर सासरे महेश गोविंद येलगुंडी, सासू यशोदा महेश येलगुंडी व चुलत सासरे पांडुरंग येलगुंडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि त्यांची पत्नी यांचे घरगुती कारणांवरून भांडण झाले. या भांडणाची माहिती सासू-सासरे यांना कळाली. चिडलेल्या सासू-सासर्‍यांनी जावई आकाश यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

You might also like