लाॅजवर काढलेले ‘तसले’ फोटो पाठवून नातेवाईक तरुणीचे मोडले ‘लग्न’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – लग्न जमले असताना होणाऱ्या सासरच्या लोकांना नात्यातील तरुणीचे अश्लील फोटो दाखवून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना घडली.

याप्रकरणी 26 वर्षीय पीडित तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनेश शिवाजी पारखी (रा. माण, ता. मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि पीडित तरुणी नात्यातील आहेत. 30 जुलै 2018 रोजी दिनेश हा पीडित तरुणीला म्हाळुंगे येथील एका लॉजवर घेऊन गेला. तिथे तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचे 30 ते 40 अश्लील फोटो काढले. हे फोटो त्याने मित्राच्या मोबाईलवर पाठवले. तसेच तरुणीचे लग्न जमल्यानंतर लॉजवर काढलेले अश्लील फोटो तरुणीच्या सासरकडच्या मंडळींच्या मोबाईलवर पाठवून तिचे लग्न मोडले. या धक्कादायक प्रकारामुळे पीडित तरुणीचे कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. तपास चाकण पोलीस करीत आहेत.