मोबाईल दुकान फोडून 18 लाखांचा ऐवज चोरला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आळंदी रोड भोसरी येथे मोबाईल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 16 लाख 25 हजार रुपयांचे 137 मोबाईल फोन आणि एक लाख 47 हजारांची रोकड असा एकूण 17 लाख 72 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

या प्रकरणी विशाल भागाजी निमसे (वय 32, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल यांनी त्यांचे आळंदी रोडवरील मोबाईल दुकान मंगळवारी रात्री दहा वाजता बंद केले.

रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानात विक्रीसाठी ठेवलेले 16 लाख 25 हजार रुपयांचे 137 मोबाईल फोन आणि एक लाख 47 हजारांची रोकड असा एकूण 17 लाख 72 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार बुधवारी सकाळी दुकान उघडण्याच्या वेळी उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

You might also like