पिंपरीत भाईगिरीच्या वादातून गुन्हेगाराचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – परिसरात स्वतःच्या ग्रुपचे (भाईगिरी) वर्चस्व असावे यातून झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करुन खुन करण्यात आला. ही घटना चिखलीमधील घरकुल वसाहत येथे शुक्रवारी (दि. 29) घडली.
अनिकेत रणदिवे (18, रा. चिखली) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत याचे चिखली येथील काही तरुणांसोबत वाद सुरू होते. भाईगिरी आणि वर्चस्वावरून त्यांच्यात भांडणे होत होती. शुक्रवारी तीन जणांनी अनिकेत याच्यावर कोयता, चॉपर आणि सिमेंटच्या गट्टूने मारून खूनी हल्ला केला.

यात अनिकेत गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.