पिंपरी : दारूच्या बाटलीने गळा चिरुन तरुणाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुंजी येथील मोकळ्या मैदानात एका तरुणाचा गळा चिरुन खून करण्यात आलेला आहे. मैदानात दारु पिताना झालेल्या वादातून बीयरच्या बाटलीने गळा चिरलेला आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.

निलेश नाईक (३०, रा. जयसिंगपूर, कोल्हापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारुंजी येथील कोलते पाटील साइटच्या बाजूला मोकळे मैदान आहे. या मैदानात निलेश आणि त्याचे मित्र दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी त्यांच्यात वादावाद झाली असावी. त्यानंतर एकाने बियरची बाटली फोडून त्याचा गळा चिरला आहे. मारेकरी फरार झाले असून पोलीस शोध घेत आहेत.

Visit : policenama.com