पिंपरी : तडीपार गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – तडीपार गुन्हेगाराकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेच्या खंडणी व दरोडा विरोधी पथकाने केली आहे.
अविनाश बाळू धनवे (28, रा. वडमुखवाडी, च-होली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस शिपाई आशिष बनकर आणि गणेश कोकणे यांना माहिती मिळाली की, तडीपार गुन्हेगार अविनाश धनवे हा लग्नाच्या कार्यक्रमासाठी आळंदी येथील अगस्ती मंगल कार्यालय येथे आला आहे. त्याच्याकडे पिस्तूल आहे.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धनवे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असा तीस हजार आठशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. धनवे त्याच्यावर दिघी पोलिस ठाण्यात तीन, आळंदी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

त्याने तडीपारीचा आदेशाचा भंग करून पुणे जिल्ह्यात प्रवेश केल्याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लोहार, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी आशिष बनकर, गणेश कोकणी, सुधीर डोळस, राजेश कौशल्ये यांच्या पथकाने केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like