पिंपरी : गावठी कट्टा, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस जवळ बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली.
विक्या घिसाडी उर्फ विकास बबन पवार ( ३८, रा. शिवशक्ती तरुण मंडळ , रेल्वे लाईन जवळ , दापोडी पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार रोहीदास बो-हाडे यांना गोपनिय खबर मिळाली की चोंधे लॉन्स, नदीचे पुलाजवळ, विशालनगर येथे एक इसम गावठी कट्टा विक्रीसाठी घेवुन येणार आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला येथे कशासाठी आला आहे असे विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. त्याचे हातात असलेल्या कापडी पिशवीत काय आहे असे विचारले असता त्याने सदर पिशवी त्याचे मागे लपविण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी त्याच्या हातातील कापडी पिशवी घेवुन उघडुन पाहीली असता त्यामध्ये एक गावठी कट्टा ( रिव्हॉल्वर ) व दोन जिवंत काडतुस मिळुन आला. त्याच्याकडे सदर गावठी कट्टा ( रिव्हॉल्वर ) व दोन काडतुस बाबत विचारपुस केली. त्याने त्याबाबत उडवाउडवीचे उत्तरे देवुन त्याबाबत समाधानकारक खुलासा केला नाही .

सदरची कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे , सहाययक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ ऊंडे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) अजय भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक यशवंत साळुके , पोना रोहीदास बोऱ्हाडे , कैलास केगले , सोमनाथ असवले , विनायक देवकर , शशिकांत देवकांत , अरुण नरळे , नितीन खोपकर , अनिल देवकर , दिपक पिसे , हेमंतकुमार गुत्तीकोंडा यांनी केली आहे .