पिंपरी : वाकड-हिंजवडी परिसरातील Lonunge cafe Hub Roof Top या मॉलमधील Avira Thai Spa मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश अन् 5 महिलांची सूटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –    पिंपरी पोलिस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने वाकड-हिंजवडी रोलगत असलेल्या Lonunge cafe Hub Roof Top या मॉलमधील पहिल्या मजल्यावरील Avira Thai Spa या मसाज सेंटरमध्ये छापा टाकून अवैधरित्या चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलसांनी 5 महिलांची सूटका केली आहे. स्पाच्या महिला मॅनेजरसह स्पाचा मालक राहुल चव्हाण (40) याच्याविरूध्द हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाकड-हिंजवडी रोलगत असलेल्या Lonunge cafe Hub Roof Top या मॉलमधील पहिल्या मजल्यावरील Avira Thai Spa या मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट चालू असल्याबाबतची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक निरीक्षक अशोक डोंगरे, कर्मचारी विजय कांबळे, सुनिल शिरसाठ, भगवंता मुठे, नितीन लोंढे, अमोल शिंदे, मारूती करचुंडे, योगेश तिडके आणि महिला कर्मचारी वैष्णवी गावडे यांच्या पथकाने छापा टाकून 5 महिलांची सुटका केली होती. स्पा सेंटरमधून 32 हजार 535 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये रोख रक्कमेसह मोबाईल फोनचा समावेश आहे.