बहिणीकडून अभ्यास करुन घेतला म्हणून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – बहिणीकडून अभ्यास करून घेतला म्हणून विध्यार्थ्याला शिक्षिकेने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी सातच्या सुमारास देहूरोड बाजार येथे घडली.

नाझवीन परवेझ शेख (रा. देहूरोड बाजार, देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलाची आई छाया तरुणसिंग (40, रा. बारलोटा नगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी छाया यांचा मुलगा चैतन्य तरुणसिंग (वय 10) हा रिपब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये चौथ्या वर्गात शिकतो. त्याचा आणखी चांगला अभ्यास व्हावा यासाठी मागील दीड महिन्यापूर्वी त्याचा आरोपी शिक्षिका शेख यांच्या खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. शनिवारी नेहमीप्रमाणे चैतन्य क्लासला गेला. क्लासमध्ये चैतन्य याने त्याचा गृहपाठ त्याच्या बहिणीकडून का करून आणला ? या कारणावरून चैतन्यला काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये चैतन्यच्या हाताला व पायाला इजा झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Visit : policenama.com

You might also like