पिंपरी : रहाटणी मधील अंबिका ज्वेलर्सही फोडले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी दोन सराफ दुकाने फोडली आहेत. कस्पटे वस्ती येथील कणक ज्वेलर्स आणि रहाटणी येथील अंबिका ज्वेलर्स फोडून किमती ऐवज चोरून नेला आहे. अंबिका ज्वेलर्सचे शटर उचकटून तीन किलो चांदी नेली असून सोन्याचे दागिने सुरक्षित आहेत. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रहटणी येथील सिंहगड कॉलनी च्या समोर अंबिका ज्वेलर्स आहे. बुधवारी रात्री नेहमी प्रमाणे मालक मनोहर सिंग रात्री नऊ वाजता दुकान बंद करुन घरी गेले होते. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता दुकानाचे शटर उचकटल्याचे शेजारील दुकानदार यांना दिसले. त्यांनी याबाबत फोन करुन सिंग यांना कळवले.

चोरट्यांनी शटर उचकटून नवीन चांदी व जुनी मोडीची चांदी असा तीन किलो ऐवज चोरुन नेला आहे. तर ज्वेलर्स मधील डीव्हीआर काढून नेला आहे. शेजारील दुकानाच्या सीसीटीव्हामध्ये अंबिका ज्वेलर्सचा काही भाग दिसत असून त्यामध्ये दोन संशयित दिसत आहेत. तपास वाकड पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/