‘या’ राज्यात क्वारंटाईन करण्यासाठी पैसे घेणार सरकार, मुख्यमंत्री म्हणाले – ‘एकटे खर्च उचलू शकत नाही’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – केरळमध्ये कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यामध्ये मंगळवारी 67 प्रकरणे समोर आली आहे. प्रदेशामध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकांवर पाळत ठेवली जात आहे. राज्यामध्ये कोरोनामुळे संक्रमित लोकांची संख्या 963 इतकी झाली आहे. यामधील 415 लोकांवर उपचार सुरु आहे. यादरम्यान सरकारने निर्णय घेतला आहे की, जे लोक परदेशातून परत येत आहे त्यांच्याकडून क्वारंटाइनचे पैसे घेतले जातील याव्यतिरिक्त देशाच्या वेगवेगळ्या भागातून परत येणारे जे लोक आहे त्यांना संस्थागत क्वारंटाईन केले जाईल. त्यांनाही पैसे द्यावे लागतील.

केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी मंगळवारी याची माहिती देताना सांगितले की, लाखो संख्येने लोक राज्यातून परत येत आहे. जे लोक संस्थागत क्वारंटाईन आहे त्यांना पैसे भरावे लागतील. सरकार या लोकांचा खर्च उचलू शकत नाही. हा नियम सगळ्यांसाठी लागू असणार नाही पण परदेशातून परत येणाऱ्या सर्व लोकांसाठी हा नियम लागू असेल.

विजयन म्हणाले की, राज्य अनेक प्रकारच्या देय प्रकारांचे निर्णय घेईल आणि कमीतकमी पैसे घेतील ज्यामुळे लोक आर्थिक स्वरुपात गरीब लोकांना मदत करु शकतील. सरकार क्वारंटाईनचे जे पैसे घेणार आहे ते खूप कमी असणार आहे. देशातील अनेक राज्य आणि परदेशातून मोठ्या संख्येने लोकांनी परत येण्यासाठी नोंदणी केली आहे. आम्ही परत येणाऱ्या लोकांचे स्वागत करतो. एकदा ते येथे आले तर त्यांना क्वारंटाईनचे पुर्ण पालन करावे लागेल.

मुख्यमंत्रींनी माहिती देताना सांगितले की, आत्तापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त लोक वेगवेगळ्या राज्यातून परतले आहे. याव्यतिरिक्त परदेशातून 1.35 लाख मधून 11,189 लोक परत आहे आहे.