कझाकिस्तान : विमानाची इमारतीला धडक, 100 प्रवाशांचे जीव धोक्यात, 9 जणांचा मृत्यू

अलमाटी : वृत्त संस्था – कझाकिस्तानमधील अलमाटी विमानतळावरुन उड्डाण करत असताना एका विमानाने इमारतीजवळील एका इमारतीला धडक दिली आहे. या विमानात ९५ प्रवासी व ५ क्रु मेंबर होते, कझाकिस्तानमधील अलमाटी विमानतळाजवळ हा अपघात झाला. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी हा अपघात घडला. या अपघातात आतापर्यंत किमान ९ जणांचा मृत्यु झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. अपघातानंतर विमानाचे तुकडे झाले आहेत.

याबाबत विमानतळ अथोरिटीने दिलेल्या माहितीनुसार बेक एअर क्राफ्टचे हे विमान कझाकिस्तानच्या अलमाटी विमानतळावरुन राजधानी तूर सुलतान या शहराकडे जाणार होते. विमानात ५ कर्मचारी आणि ९५ प्रवासी होती. विमानाने उड्डाण घेण्यास सुरुवात केली. पण, धावपट्टीवर पुढे जात असताना धावपट्टी संपली तरी त्या विमानाने अपेक्षित उंची घेतली नाही.

https://twitter.com/DTareszkiewicz/status/1210400676561506306

त्यामुळे धावपट्टीच्या पुढे असलेल्या सरंक्षण भिंतीला ते धडकले. त्यामुळे पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटले व ते दुमजली इमारतीला जाऊन धडकले. या अपघातानंतर तातडीने मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. विमानाचे दोन ते तीन तुकडे झाले असून आतापर्यंत किमान ९ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/