NEET, JEE Main बद्दल मोठी बातमी परीक्षा रद्द करण्यासाठी उचलण्यात आलं ‘हे’ मोठं पाऊल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरातील कोट्यावधी विद्यार्थी कोरोना विषाणूमुळे यंदा दोनदा पुढे ढकलण्यात आलेल्या एनईईटी आणि जेईई मेन परीक्षेची वाट पाहत आहेत. या दोन्ही परीक्षा आता सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय केला गेला आहे. पण आता या आयोजनाबाबत पुन्हा संभ्रम दिसत आहे. वास्तविक सप्टेंबरमध्ये होणाऱ्या नीट आणि जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी याचिकेत केली गेली आहे.

सप्टेंबरमध्ये होणार होती परीक्षा
राष्ट्रीय चाचणी एजन्सीने (एनटीए) नोटीस जाहीर करून सप्टेंबरमध्ये एनईईटी आणि जेईई परीक्षा आयोजित करण्याबाबत म्हटले होते. यानुसार जेईई मुख्य परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान घेण्याचा आणि नीट परीक्षा १३ सप्टेंबरला घेण्याचा प्रस्ताव आहे. देशभरातून सुमारे २० लाख विद्यार्थी नीट आणि जेईई परीक्षांमध्ये भाग घेत आहेत.

११ शहरातील ११ विद्यार्थ्यांनी दाखल केली याचिका
कोरोना विषाणूचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये राष्ट्रीय चाचणी संस्था म्हणजे एनटीएची ३ जुलैची नोटीस फेटाळण्याची मागणी केली गेली आहे, ज्यामध्ये नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, नीट आणि संयुक्त प्रवेश परीक्षा, जेईई मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यास सांगितले गेले आहे. ११ शहरांमधील ११ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, परिस्थिती सामान्य झाल्यावर या परीक्षा घेण्यात याव्यात.

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेताना राष्ट्रीय चाचणी एजन्सीने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले की काही राज्यांनी कोणतीही व्यावसायिक आणि अव्यावसायिक परीक्षा घेण्यास अपात्र असल्याचे जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत ही लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात आणण्याची बाब आहे.