PM Kisan | खुशखबर ! उद्या शेतकर्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये, ‘या’ पध्दतीनं तपासा यादीतील तुमचं नाव
नवी दिल्ली : PM Kisan | पीएम किसान (PM Kisan) च्या 9 व्या हप्त्याचे (9th Installment) 2000 रुपये उद्या शेतकर्यांच्या खात्यात सरकार टाकणार आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी अंतर्गत देशातील शेतकर्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
पंतप्रधान किसान सम्मान निधी (PM kisan Samman Nidhi) अंतर्गत शेतकर्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत 8 हप्ते शेतकर्यांना देण्यात आले आहेत. देशातील 12.11 कोटी शेतकर्यांना 9 व्या हप्त्याचे पैसे दिले जातील.
असे चेक करा लिस्टमध्ये नाव
1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.
3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.
4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
5. यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.
कशी ठरवली जातात नावे
जमीनीच्या रेकॉडच्या तपासणीनंतर शेतकर्यांद्वारे अर्जात जोडलेल्या जमीनीच्या कागदपत्रांची तपासणी होते. जर हे योग्य असेल तर शेतकर्याचे नाव किसान सम्मान निधी पोर्टलवर लाभार्थींच्या यादीत जोडले जाते. पोर्टलवर शेतकरी कुटुंबांच्या नावांचा समावेश करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. लाभार्थी यादीत नाव नोंदल्यानंतर शेतकर्यांच्या खात्यात योजनेची रक्कम ट्रान्सफर केली जाते.
Pune Unlock | पुण्यातील निर्बंध शिथील? उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना Live Video