Pune Unlock | पुण्यातील निर्बंध शिथील? उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना Live Video

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Unlock | गेल्या 3 महिन्यापासून पुणे शहर निर्बंधाच्या कचाटयात अडकले आहे. निर्बंधातून कधी एकदा मुक्तता (Pune Unlock) मिळेल असं पुणेकरांना झालं आहे. राज्य सरकारनं ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे तिथं निर्बंध शिथिल केलेले आहेत. पुण्यातील निर्बंध देखील शिथिल करावेत याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (chief minister uddhav thackeray) यांच्याशी चर्चा केली. आज पुण्यात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू आहे. बैठकीत अजित पवार परिस्थितीचा आढावा घेऊन पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत. काही वेळातच आढावा बैठक संपणार असून अजित पवार मीडियाशी बोलणार आहेत.

पुण्यातील निर्बंध शिथिल (Pune Unlock) करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे पुण्यातील दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांवर निर्बंध काही प्रमाणावर निश्चितपणे शिथिल होण्याची दाट शक्यता आहेत. निर्बंधामध्ये कितपत शिथिलता देण्यात येईल हे अगदी काही वेळातच स्पष्ट होणार आहेत. दरम्यान, मुंबईत वेगळा नियम आणि पुण्यात वेगळा नियम यावरून पुण्यातील व्यापारी संतप्त झाले होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (mayor murlidhar mohol) यांनी त्याबाबत राज्य सरकारला पत्र देखील लिहीले होते. पुण्यातील निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी देखील करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर पुण्यातील व्यापारी महासंघाने त्यासाठी घंटानाद आंदोलन देखील केले होते. अखेर आज (रविवार) उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. काही वेळातच पुण्यातील निर्बंध कितपत शिथील करण्यात आले हे समजणार आहे.

Web Title :- Pune Unlock | Restrictions in Pune relaxed? Deputy Chief Minister Ajit Pawar talking to the media Live Video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PF Account | पीएफचे पैसे काढायचे असतील तर लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा अडकतील सर्व पैसे !

Voltro Motors | केवळ 4 रुपयात करा 100 कि.मी.चा प्रवास, जाणून घ्या Voltro इलेक्ट्रिक सायकलबाबत

Assistant Public Prosecutors | राज्यातील 210 सहायक सरकारी वकिलांना बढती