PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसान e-KYC अपडेट करण्याची तारीख वाढवली; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Samman Nidhi Yojana | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) देशातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक महत्वाची योजना राबवली जात आहे. पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) 12.53 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजारांचा हप्ता 3 टप्प्यात येत असतो. त्यासाठी सरकारने यंदा या योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी अपडेट (e-KYC Update) करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता e-KYC अपडेट करण्याची मुदतही सरकारने वाढवली आहे.

 

पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य असणारी eKYC आता 22 मे पर्यंत पूर्ण करण्याची मुभा दिली गेली आहे. याअगोदर e-KYC करण्याची अंतिम तारीख 31 मार्च होती. या योजनेचा पुढचा हप्ता या महिन्यात कधीही तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो, मात्र, जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर 2 हजार रुपयांचा हप्ता थांबण्याची शक्यता आहे. असं सांगण्यात आलं आहेे.

 

ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख बदलण्यात आली आहे. पोर्टलवरील नवीन अंतिम मुदत वाढवून आता 22 मे 2022 अशी केली असणार आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना आता वेळ काही दिलासा मिळाला आहे. असं असलं तरी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक असल्याचं सांगण्यात येत आहे. नाहीतर तुमचा पुढचा हप्ता जमा होण्यात अडचण निर्माण होऊ शकते. दरम्यान, या योजनेचा 11 वा हप्ता या महिन्यात येण्याची शक्यता आहे.

 

ई-केवायसी (e-KY) करण्याची प्रक्रिया –

प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल फोन ब्राऊझरच्या क्रोम आयकॉनवर टॅप करा आणि तेथे pmkisan.gov.in टाइप करा.

तुम्हाला पीएम किसान पोर्टलचे मुखपृष्ठ दिसेल, त्याच्या तळाशी गेल्यानंतर ई-केवायसी पर्याय दिसेल. यावर टॅप करा.

त्यात तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणवर टॅप करा.

आता त्यात आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 4 अंकी OTP येईल.

हा OTP तेथे दिलेल्या बॉक्समध्ये टाइप करा.

पुन्हा एकदा तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी असणाऱ्या बटणावर टॅप करण्यास सांगितले जाईल.

त्यावर टॅप करा आणि आता तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आणखी 6 अंकी OTP येईल.

तो भरा आणि सबमिट वर टॅप करा.

 

Web Title :- PM Kisan Samman Nidhi Yojana | pm kisan e kyc update date extended till 22nd may update

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा