PM Kisan चा हप्ता घेणार्‍या शेतकर्‍यांना मिळू शकतो पेन्शनचा लाभ, ‘या’ स्कीम अंतर्गत जमा करावे लागतील इतके पैसे; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत देशातील नोंदणीकृत शेतकर्‍यांना 6 हजार रुपये वार्षिक मिळतात. परंतु केंद्र सरकारची आणखी एक योजना आहे, जी शेतकर्‍यांच्या भविष्यासाठी चांगली ठरू शकते. ती योजना प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Kisan Maan Dhan Yojana) आहे. ही एक पेन्शन स्कीम आहे. जे शेतकरी पीएम किसान सम्मान निधीचा लाभ घेतात ते या स्कीमसाठी सहज अर्ज करू शकतात.

 

Kisan Maan Dhan Yojana

पीएम किसान स्कीमचा लाभ घेणारे शेतकरी मानधन योजना अतंर्गत आपल्यासाठी पेन्शनची व्यवस्था सुद्धा करू शकतात. पीएम किसान प्रमाणेच मानधन योजनासुद्धा छोट्या आणि सीमांत शेतकर्‍यांसाठी आहे. मानधन स्कीम अंतर्गत शेतकर्‍यांसाठी सरकार पेन्शनची व्यवस्था करते. यासाठी शेतकर्‍यांना दर महिना एक रक्कम भरावी लागेल.

 

दर महिना मिळेल पेन्शन

पीएम किसान सम्मान निधी स्कीममधील शेतकर्‍यांना योजनेत (Kisan Maan Dhan Yojana) सहभागी होणे खुप सोपे आहे. कारण मानधन योजनेत अशा शेतकर्‍यांचे रजिस्ट्रेशन डायरेक्ट केले जाते. यात सहभागी होण्यासाठी शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची कागदपत्र द्यावी लागत नाहीत. मानधन योजनेंतर्गत 60 वर्षाच्या वयानंतर शेतकर्‍यांना दरमहिना पेन्शन म्हणून 3000 रुपये मिळतील.

 

मानधन स्कीमसाठी असा करा अर्ज

18-40 वयोगटातील लोक यासाठी अर्ज करू शकतात.
2 हेक्टर किंवा यापेक्षा कमी कृषी योग्य जमीन असणारे शेतकरी या स्कीममध्ये गुंतवणूक करू शकतात.
जर लाभार्थ्याचा काही कारणामुळे मृत्यू झाला तर योजनेंतर्गत मिळणारी पेन्शन लाभार्थ्याच्या पत्नीला मिळेल.
मात्र पेन्शनची रक्कम अर्धी म्हणजे 1,500 रुपये असेल.

 

पीएम किसानमधून कापले जातील पैसे

शेतकर्‍यांना दरमहिना 55 रुपये किंवा वार्षिक 660 रुपये जमा करावे लागतील.
यानंतर ते 60 व्या वर्षाच्या वयानंतर तीन हजार रुपये पेन्शनचा लाभ घेऊ शकता.
जर एखाद्या शेतकर्‍याची इच्छा असेल तर मानधन योजने (Kisan Maan Dhan Yojana) साठी अंशदान पीएम किसान स्कीम अंतर्गत मिळणार्‍या रक्कमेतून कापली जाईल.
शेतकर्‍याला आपल्या खिशातून पैसे द्यावे लागणार नाहीत.

Web Title : PM Kisan | under this pm mandhan scheme farmers get 3000 rupees per month pension know the all details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पत्नीच्या बाळंतपणाचा खर्च देण्यासाठी सासुरवाडीत जावयाला मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

Anil Deshmukh Case | अनिल देशमुख क्लिन चीट  प्रकरणात पुण्यात घडली ‘ही’ महत्वाची ‘घडामोड’; CBI ने FIR मध्ये नेमके काय म्हटले हे जाणून घ्या

Indian Railways | Train ने रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी खुशखबर, Special Train मध्ये चालणार आता ‘हे’ तिकिट; जाणून घ्या