Pune Crime | पत्नीच्या बाळंतपणाचा खर्च देण्यासाठी सासुरवाडीत जावयाला मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : Pune Crime | विवाहितेला माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ  होताना दिसतो. तसेच पहिले बाळंतपण हे साधारणपणे माहेरी करण्याची आपल्याकडे पुर्वांपारापासून पद्धत आहे. पण इंदापूर तालुक्यात पत्नीच्या बाळंतपण व गायीचे पैसे दे म्हणून जावयाला मारहाण (Pune Crime) करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सोमनाथ शंकर शिंदे (वय २८, रा. पिंपरी ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सोमनाथ शंकर काळेल, भोजु सोमनाथ काळेल, अक्षय सुनिल काळेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंदापूर जिल्ह्यातील कौठळी गावात शुक्रवारी सकाळी घडली.

सोमनाथ शिंदे हे मजुरी काम करतात. त्यांची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी माळशिरस तालुक्यातील पिंपरी गावात आली आहे. पत्नी व बाळाला पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी ते सासुरवाडीला आले होते. त्यावेळी त्यांना सासरे व मेव्हण्यांनी पत्नीच्या बाळंतपणाचा व गायीचे असे एकूण १७ हजार रुपये आणून दे, असे सांगितले. यावरुन त्यांच्यात वाद झाल्यावर आरोपींनी सोमनाथ शिंदे यांच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. पोलीस निरीक्षक मुजावर तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Indian Railways | Train ने रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी खुशखबर, Special Train मध्ये चालणार आता ‘हे’ तिकिट; जाणून घ्या

Yerwada Jail | येरवडा कारागृहाचे  अधीक्षक यु. टी. पवार यांची ‘उचलबांगडी’

Dr. Narendra Dabholkar | 5 आरोपींवर मंगळवारी होणार आरोप निश्चिती ! डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात, सुनावणीतील महत्त्वाचा टप्पा

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने केला विक्रम, एक दिवसात झाला तब्बल 60 हजार कोटीचा फायदा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Beating of father-in-law to pay for his wife’s childbirth, shocking incident in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every