दीदी, तुमचा प. बंगालच्या जनतेवरून विश्वास का उडाला ? PM मोदींनी घेतला विरोधकांचा ‘समाचार’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रामलीला मैदानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अनेक लोक सध्या CAA बाबत मोठ्या अफवा पसरवत आहेत आणि अनेक राजकीय पक्ष आपल्या वोट बँकांसाठी लोकांच्या भावना भडकवत असल्याचा आरोप देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या सभेदरम्यान पंतप्रधान बोलत होते.

काँग्रेसवर निशाणा साधत मोदींनी ज्यावेळी काँग्रेसचे दिल्लीमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार होते त्यावेळी त्यांनी येथील वसाहतींचा प्रश्न का मार्गी लावला नाही असा सवाल मोदींनी यावेळी उपस्थित केला.काँग्रेसवाल्यानी दिल्लीतील अनेक महत्वाच्या परिसरातील बंगले आपल्या जवळच्यांना दिले होते. मात्र तुमच्या घराचा विचार केला नव्हता अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

ममता दीदी, थेट युनो मध्ये पोहचल्या परंतु याच दीदी काही दिवसांपूर्वी संसदेत उभे राहून बांग्लादेश मधील येणाऱ्या घुसकोरांवर कारवाई करण्याची मागणी करत होत्या मात्र अचानक तुमचा पश्चिम बंगालच्या लोकांवरून विश्वास का उठू लागला आहे असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता दीदी यांना विचारला आहे.

रामलीला मैदानावरून पंतप्रधानांनी राज्य सरकारवर देखील चांगलीच टीका केली. दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने पाणी प्रश्नाबाबत कधीच कोणतं भाष्य केलं नसल्याचे मोदींनी यावेळी सांगितले त्यामुळे आजही दिल्लीतील जनतेला पाणी मोठ्या प्रमाणावर विकत घ्यावे लागत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात अनेक मोठे मोठे आंदोलन केले जात आहेत. जाळपोळ केली जात आहे मात्र याबाबतचा राग काढायचा असल्यास तो मोदींवर काढा, पुतळा जाळायचा असल्यास तो मोदींचा जाळा परंतु गरीबाची झोपडी आणि वाहने जाळू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/