संसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांवर PM मोदी नाराज ; मागितली नावांची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांवर खूप नाराज झाले आहेत. नरेंद्र मोदी यांनी मंत्र्याच्या या कामगिरीवर फक्त नाराजच झाले नाही तर त्यांनी पक्षाला गैरहजर मंत्र्यांची यादी तयार करायला सांगितले आहे.

मंगळवारी झालेल्या भाजपच्या साप्ताहिक संसदीय बैठकीत मोदींनी पक्षाच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना चांगलेच सुनावले आहे. मोदी यांनी या बैठकीत मंत्र्यांच्या संसदेतील उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांच्या नावाची यादी तयार करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. या दरम्यान मोदी यांनी खासदारांना समाजसेवेच्या कामात सहभागी व्हायला सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी खासदारांच्या उपस्थितीबाबत खूप नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हंटले की, जे मंत्री रोस्टर ड्युटीवर जात नाहीत त्यांची नावे मला द्या. मला सर्व ठीक करायला येते. मोदी म्हणाले की, राज्यसभेत आणि लोकसभेत मंत्र्यांना दोन दोन तासाची ड्युटी करावी लागते. बऱ्याच वेळेला मंत्री सभागृहात उपस्थित नसतात त्या वेळी विरोधी पक्षाचे नेते पत्र लिहून माझ्याकडे तक्रार करतात.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’