PM मोदींना अमेरिकेतील सिनेटरच्या पत्नीची मागावी लागली माफी, पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ह्यूस्टन येथे झालेल्या ‘Howdy Modi’ मोदी या कार्यक्रमामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक मजबूत झाल्याचा संदेश संपूर्ण जगताला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी एक साथ रॅली केली. मात्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीनेटर जॉन कॉर्निन यांच्या पत्नीची माफी मागितली आहे. कारण त्यांचा जन्म दिवस असूनही कोर्निन यांना मोदींच्या ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमासाठी हजेरी लावावी लागली होती.

मोदी म्हणाले, आज तुम्हाला माफी मागू इच्छितो कारण, आज तुमचा जन्मदिवस आहे आणि तुमचे पती माझ्यासोबत आहेत. साहजिकच तुम्हाला माझा राग येत असेल. ते पुढे म्हणाले जन्म दिवसाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. मी तुमच्या समृद्ध आणि शांतीपूर्ण जीवनाची प्रार्थना करतो.

कोर्निन हे हाउडी मोदी या कार्यक्रमाला येणारे प्रमुख रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक खासदारांपैकी एक होते. मोदी आणि ट्रम्प यांनी एकाच व्यासपीठावरून ५० हजारांहून अधिक भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना संबोधित केले.

‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात दोन शक्तिशाली देशांचे नेते एकमेकांसमोर आपले मनोगत व्यक्त करत होते. एक मेकांचा हात हातात घेऊन दोनीही देशांनी आपली मैत्री सिद्ध केली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच भारतात येणार असल्याची इच्छा व्यक्त केली.

Visit : Policenama.com