PM नरेंद्र मोदींबद्दलच्या 15 महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते आज विविध कार्यक्रमांद्वारे आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा करणार आहेत. जाणून घेऊयात त्यांच्याविषयी काही रंजक गोष्टी

1) नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला आहे.

2) लहान असताना मोदी सैन्यामध्ये भरती होऊ इच्छित होते. मात्र कुटुंबात असलेल्या गरिबीमुळे त्यांना हे शक्य झाले नाही.

3) पंतप्रधान मोदी यांनी मेहसाणा रेल्वे स्टेशनवर चहा विकला होता. 1965 च्या भारत-पाक युद्धावेळी त्यांनी सैनिकांना चहा पाजला होता.

4) स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी नरेंद्र मोदी प्रभावित झाले. त्यामुळे ते संन्यासी बनण्यासाठी रामकृष्ण मिशन आश्रमात आले होते.

5) मोदी यांना प्रखर राष्ट्रवादी म्हटले जाते. मात्र ते बुद्धीजीवी व्यक्ती असून आपल्या लहानपणी खूप हुशार होते.

6) आपले घरदार सोडून नरेंद्र मोदी देशाच्या दौऱ्यावर निघाले होते. यावेळी ते हिमालयात राहत असत. त्यांनी दोन वर्ष हिमालयात वास्तव्य केले. 1972 मध्ये ते  राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले.

7) 1987 मध्ये ते गुजरात भाजपचे सचिव झाले. त्यानंतर त्यांनी महापालिका निवडणुकीत देखील विजय मिळवला. त्यानंतर 1988 साली त्यांना भाजपाचे राष्ट्रीय महासचिव बनवण्यात आले.

8) 2001 मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. सर्वात काल मुख्यमंत्रीपदी राहण्याचा त्यांनी विक्रम केला आहे.

9) चार वेळा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

10) 2014 मध्ये त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर त्यांनी देशाचे 14 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

11) मोदींना  टेक्नोलॉजीची सर्वात जास्त माहिती आहे. ते सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असतात.

12) आपल्या कपड्यांकडे  देखील मोदी विशेष लक्ष देतात. राजकारणातील ते फॅशन आयकॉन आहेत. अहमदाबादमधील जेड ब्लू कंपनीमधूनच ते आपले कपडे खरेदी करत असतात.

13) मोदी नेहमी हिंदी भाषेत स्वाक्षरी करतात. अधिकारीक सही देखील त्यांची हिंदीतच आहे.

14) मोदींना कविता लिहिण्याचा आणि फोटोग्राफीचा देखील छंद आहे. गुजराती भाषेत त्यांनी काही पुस्तके देखील लिहिले आहेत.

15)त्यांच्या अनेक फोटोंचे प्रदर्शन देखील भरले आहे.