मोदींनी स्वत:च्या बचत खात्यातून कुंभमेळ्यातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी दिली 21 लाखांची मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वत:च्या बचत खात्यातून कुंभ मेळ्यातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी मदतनिधी म्हणून 21 लाख रुपये दिले आहेत. याशिवाय हा कुंभमेळा पुढील कित्येक वर्षांसाठी प्रेरणादायी अन ऊर्जा देणारा ठरेल असे मोदींनी म्हटले आहे. इतकेच नाही तर, या कुंभ मेळ्यात कार्यरत असलेल्या संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांच्या नियोजनाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही मोदींनी कौतुक केले.

मोदींनी यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये मोदी म्हणतात की, “उत्तर प्रदेशच्या सर्व जनतेचे अभिनंदन. खास करून प्रयागराज आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या सर्वच टीमचे या कुंभमेळ्याच्या नियोजनाबद्दल अभिनंदन.” पुढे आपल्या ट्विटमध्ये मोदी म्हणतात की, “या कुंभ मेळ्यातून आपली संस्कृती आणि अध्यात्माचे दर्शन घडते. पुढील कित्येक वर्षे या कुंभमेळ्यातील उत्साह प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठरेल.

प्रयागराज कुंभ मेळ्याची व्याप्ती पाहता स्वच्छता आणि भाविकांच्या आरोग्यासंदर्भात जी दक्षता घेण्यात आली ती विक्रमाची नोंद करणारी आहे असेही मोदींनी म्हटले आहे. शिवाय प्रयागराज कुंभमेळा हा ऐतिहासिक ठरल आहे असेही त्यांनी म्हटले आहे. या कुंभमेळ्यात स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक असणे तसेच दळणवळणह आणि कलाप्रदर्शन या सर्वांचा विक्रम नोंद आहे. याशिवाय या महामेळाव्यासाठी वापरण्यात आलेलं आधुनिक तंत्रज्ञान हे प्रशंसनीय आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या  – 

✒निविदा मंजूर होण्यापूर्वीच उड्डाणपुलाचे तिसऱ्यांदा भूमीपूजन

✒आ. कांबळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मागे

✒’..तर पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोर कला सादर करू’

✒साईभक्तांसाठी मुंबई-शिर्डी स्वतंत्र पालखीमार्ग

✒’10 वी’ची उत्तरपत्रिका सापडली झेरॉक्स सेंटरवर