पाकिस्तानवर पुढील रणनीती काय ? मोदींनी घेतली किचन कॅबिनेटसोबत बैठक 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय वायुसेनेने आज पहाटे ३.३० वाजता पाकव्याप्त काश्मीरमध्ये बालाकोट येथे हवाई हल्ला करून  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले आहे. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या हल्ल्याची संपूर्ण माहिती दिली आहे. त्यानंतर राजनाथ सिंह, अरुण जेटली सुषमा स्वराज आणि निर्मला सीतारामन यांच्या सोबत मोदींनी तातडीची बैठक घेऊन पाकिस्तानच्या विरोधातील पुढील रणनीती ठरवण्याबाबत चर्चा केली आहे.

भारतीय वायू सेनेच्या १२ मिराज विमानांनी हि हवाई हल्ल्याची कामगिरी केली आहे. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय छिन्न विछिन्न झाले आहे. जैशचे कंट्रोल रुम अल्फा-३ या हल्ल्यात पूर्णतः नष्ट झाली आहे. तर या संदर्भात संरक्षण मंत्रालय दुपारी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि निर्मला सीतारामन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेले असता. त्या ठिकाणी मोदींनी पाकिस्तानच्या पुढील रणनीती संदर्भात बैठक घेतली आहे असे सूत्रांनी सांगितले आहे. या बैठकीला अजीत डोवाल देखील उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानच्या संभाव्य हल्ल्या संदर्भात माहिती दिली आहे. हि बैठक ४५ मिनिटे चालली. तसेच या बैठकीत भारताच्या सतर्कते आणि सुरक्षेच्या संदर्भात चर्चा झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला 

भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त 

भारतीय हल्ल्याचा पाकिस्तानने व्हिडिओ केला जारी 

पाकिस्तानवर बाॅम्बहल्ला : पंजाबमधील आदमपूरहून केली कारवाई 

त्या हजार जखमांच्या बदल्यात भारताने १००० बॉम्ब देणे योग्यच 

निवांत झोपा सांगून स्वतःच झोपले ; नेटकऱ्यांकडून पाकिस्तानची फिरकी

भारताचा पाकवर एअर स्ट्राइक : २१ मिनिटे सुरु होता हल्ला 

पाकिस्तानच्या मंत्रालयात तातडीची बैठक सुरु

पाकच्या विमानांनी केला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न 

‘या’ 10 हून अधिक जागांवर भारतीय हवाई दलाने केला हल्ला 

भारत कमजोर देश नाही : मुख्यमंत्री