भारत ऑस्ट्रेलियामध्ये मोठी ‘डील’, दोन्ही देश वापरणार एकमेकांचा ‘मिलिट्री बेस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये गुरूवारी एका मोठ्या डीलवर सहमती झाली. आता दोन्ही देश एकमेकांचे मिलिट्री बेस वापरू शकतात. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, या डीलचा अर्थ आहे की, आता इंडो पॅसिफिक क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये जास्त सैन्य सहकार्य होऊ शकते. या डीलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रलियाचे पीएम स्कॉट मॉरिसन यांच्यामध्ये एक व्हर्च्युअल समिट दरम्यान हस्ताक्षर करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी ऑस्ट्रेलियाचे पीएम स्कॉट मॉरिसन यांच्या सोबत ऑनलाइन शिखर संमेलनामध्ये सहभाग घेतला, ज्यामध्ये आरोग्य सेवा, व्यापार आणि संरक्षण क्षेत्रासह द्विपक्षीय संबंधांच्या विविध बाजू आणखी मजबूत करण्यावर चर्चा झाली. आपल्या सुरूवातीच्या भाषणात पीएम मोदी यांनी म्हटले की, त्यांचे म्हणणे आहे की, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संबंधांना आणखी सशक्त करण्यासाठी ही उपयुक्त वेळ, उपयुक्त संधी आहे. तसेच आपली मैत्री आणखी मजबूत करण्यासाठी आपल्या जवळ अनेक अमार्याद शक्यता आहेत.

पंतप्रधान म्हणाले, आपले संबंध आपल्या क्षेत्रासाठी आणि जगासाठी एक स्थिरतेचे कारक व्हावेत, आपण एकत्र येऊन जागतिक कल्याणासाठी कार्य करावे, अशा सर्व बाजूने विचार करण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलिया सोबतचे आपले संबंध व्यापक पद्धतीने आणि वेगाने पुढे नेण्यास भारत प्रतिबद्ध आहे. हे केवळ आपल्या दोन्ही देशांसाठीच उपयोगी नसून हिंद प्रशांत प्रदेश आणि जगासाठी सुद्धा आवश्यक आहे.