PM Modi | खेलरत्न पुरस्काराचे नामकरण म्हणजे राजकीय खेळ; शिवसेनेची मोदी सरकारवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) नुकतंच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नामकरण केले आहे. याबाबत माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विटच्या माध्यमातून दिली होती. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असं नामकरण केल्याने यावरून आता शिवसेनेनं (Shiv Sena) सामनातून प्रतिक्रिया दिली आहे. खेलरत्नचं पुरस्काराचे नामकरण म्हणजे केंद्र सरकारचा (Central Government) हा राजकीय खेळ असल्याची टीका शिवसेनेच्या सामानातून केली आहे.

पंतप्रधान मोदी आणि दिवंगत जेटलींचं नाव क्रिकेट स्टेडियमला दिलं गेलंय, त्यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी केली होती?, असा सवाल देखील सामना अग्रलेखातून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी उपस्थित केलाय. केंद्र सरकारने हा राजकीय खेळ केला. या राजकीय खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत, असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्रावर (Central Government) टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, पुढं सामनातून असं सांगण्यात आलं आहे की, मोदी सरकारचे म्हणणे आहे की, ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार देणे ही लोकभावना आहे. परंतु, राज्य हे सूडाने, द्वेषाने चालवता येत नाही हीसुद्धा एक लोकभावना आहे. आणि त्या भावनेची दखल घ्यावीच लागेल, असा महत्त्वाचा मुद्दा संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सामनातून स्पष्ट केला आहे. लोकभावना वगैरे बोलायला ठीक आहे, पण सध्या राज्यकर्ते ठरवतात तीच लोकभावना आणि त्या लोकभावनेवर भजनाचे टाळ वाजवणे हेच सुरु आहे, अशी खंत देखील सामना अग्रलेखातून व्यक्त केली गेली आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या वादात महिलेने चावा घेऊन तोडले तरूणाचे बोट, खडकमध्ये FIR

Fact Check | महिन्यात ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास लागणार 173 रुपयांचा टॅक्स? जाणून घ्या सत्य

Pune Crime | पुण्याच्या उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा ‘थरार’; दुचाकीवरुन आलेल्या गुंडांनी झाडल्या 6 गोळ्या, प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  PM Modi | samaana editorial sanjay raut criticized modi government over naming khelratna award

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update