PM Modi Visit To Pune Corporation | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये ‘तू तू मैं मैं’

'महाराष्ट्र कॉंग्रेसमुळेच कोरोनाचा प्रसार झाल्याचे पंतप्रधानांचे मत योग्यच' - भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक

युक्रेनमधील विद्यार्थ्यांची सुटका होईपर्यंत पंतप्रधानांनी निवडणुकांचा प्रचार आणि उदघाटने टाळावीत – युवक कॉंग्रेस

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi Visit To Pune Corporation | महाराष्ट्र कॉंग्रेसमुळे (Maharashtra Congress) कोरोनाचा (Corona) देशात मोठ्या प्रमाणात फैलाव झाला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे विधान शंभर टक्के सत्य आहे. त्यामुळे या विधानावरून कॉंग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍यात निदर्शने करण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देउ असा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी दिला आहे. तर युवक कॉंग्रेसने युक्रेनमधून भारतीय विद्यार्थी सुखरूप भारतात (Indian Students In Ukraine) येत नाहीत तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांचा प्रचार आणि उदघाटनांचे कार्यक्रम बाजुला ठेवावेत, असे आवाहन पंतप्रधानांना केले आहे. (PM Modi Visit To Pune Corporation)

 

कोरोना काळात महाराष्ट्र कॉंग्रेसने बाहेरील राज्यात जाणार्‍या नागरिकांना रेल्वे प्रवास उपलब्ध करुन दिल्याने देशभरात कोरोना पसरल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा प्रचारादरम्यान केले आहे. यावरून महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी मोदी यांच्यावर तोफ डागत मोदी यांनी महाराष्ट्राचा व तमाम मराठी माणसांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. शहर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने ६ मार्चला पुणे दौर्‍यावर येणार्‍या मोदी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी निदर्शने केल्यास कॉंग्रेसला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Prashant Jagtap) यांना गांभीर्याने घेत नसल्याचीही टीका केली आहे. एकंदरच मोदी यांच्या दौर्‍यावरून पुण्यातील आणि राज्यातील राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. (PM Modi Visit To Pune Corporation)

दरम्यान प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव अक्षय जैन (Youth Congress Akshay Jain) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहेत.
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. ते जीव मुठीत धरून सुटकेची वाट पाहात आहेत.
एका विद्यार्थ्याचा बळी गेला असून हजारो पालक मुलांच्या वाटेकडे डोळे लावून चिंताग्रस्त झाले आहेत.
अशा परिस्थितीत पंतप्रधान निवडणूक प्रचारात आणि उदघाटनांच्या कार्यक्रमात मग्न आहेत.
सर्व विद्यार्थी सुखरूप येईपर्यंत पंतप्रधानांनी त्यांचे निवडणूक प्रचाराचे दौरे आणि उदघाटनांचे कार्यक्रम बाजूला ठेवून
दिल्लीत थांबून विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी गतिने पावले उचलावीत, असे आवाहन जैन यांनी केले आहे.
तसेच पिंपरी चिंचवड युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) मेट्रोचे काम अर्धवट असताना केवळ निवडणुकांच्या तोंडावर उदघाटन करण्याचा घाट घातला जात आहे.
मेट्रोच्या (Pune Metro) उदघाटनाला आमचा विरोध असल्याचे पत्र पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिले आहे.

 

 

Web Title :- PM Modi Visit To Pune Corporation | BJP Maha Vikas Aghadi Government Pune Youth Congress PM Narendra Modi BJP Jagdish Mulik Prashant Jagtap Akshay Jain

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Modi Visit To Pune Mahapalika Bhavan | पंतप्रधान महापालिका भवनमध्ये येणार पण ‘या’ कारणामुळं सत्ताधारी भाजपसह अनेक नगरसेवकांचा ‘हिरमोड’

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 78 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corporation | विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी महापालिकेचा ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ उपक्रम