चहावाला ते पंतप्रधान, PM नरेंद्र मोदींचा राजकीय प्रवास व महत्वाचे निर्णय, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 69 वा जन्मदिन साजरा करत आहेत. नरेंद्र मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगर या छोट्याशा गावात झाला. पंतप्रधान मोदींनी गुजरात विद्यापिठातून मास्टर ऑफ सायन्समध्ये पदवी प्राप्त केली. वडिलांना मदत व्हावी म्हणून त्यांनी वडिलांसोबत वडनगर रेल्वे स्थानकात चहा विकण्याचं काम करायला सुरूवात केली. शालेय जीवनात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले.

राजकीय कारकीर्द –

1991 मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला. 1995 मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. 2001 ते 2002 व नंतर 2002 ते 2007 तसेच 2007 ते 2012 या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत. 2001मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 2002 मध्ये राजकीय दबावामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला मात्र पुन्हा एकदा बहुमतानं जनतेनं त्यांना जिंकवलं आणि ते मुख्यमंत्री झाले. 2007 आणि 2012 साली विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बहुमताने गुजरातचे मुख्यमंत्री होण्याचा मान नरेंद्र मोदींनी मिळवला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी 13 वर्षाच्या कार्यकाळात एकही सुट्टी घेतली नाही. मोदींनी 26 में 2014 रोजी पंतप्रधान पदाची पहिल्यांदा शपथ घेतली. या पदावर पोहोचणारे रा.स्व.संघाचे ते पहिले प्रचारक तर दुसरे स्वयंसेवक होत. त्यानंतर मे 2019 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.

घेतलेले महत्वाचे निर्णय –

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यकाळात देशासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. नोटाबंदी, जीएसटी, करप्रणालीतील बदल, रस्ते वाहतुकीसाठी केलेले बदल, सर्जिकल स्ट्राईक, ऑनलाईन नेटबँकिंग सुविधा, विविध योजना थेट घरापर्यंत पोहोचवणे आणि त्याचे पैसे सबसिडी थेट जनतेच्या खात्यावर टाकणे, बुलेट ट्रेन, तिहेरी तलाक, कलम 370 हटवण्याचा निर्णय, गंगा शुद्धीकरणाचा निर्णय, संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूक, भूसंपादन कायदा, रोजगार हमी योजनेच्या कायद्यात बदल करणं, अटल बिहारी पेन्शन योजना, सुकन्या योजना, उज्ज्वला योजना, मुद्रा लोन सारख्या महिलांसाठी सुविधा पंतप्रधान मोदींनी आणल्या.

You might also like