PM मोदींनी संवाद साधल्यामुळं भारतात ‘लॉकडाऊन’ यशस्वी, केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधनातील दावा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. भारत हा जगातील असा एक देश आहे, जिथे कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. या दरम्यान, केंब्रिज विद्यापीठाने एक संशोधन केले आहे, त्यांनी असा दावा केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतत साधलेला संवाद आणि वेळोवेळी जनतेला केलेली अपील यांमुळे लॉकडाऊन यशस्वी झाले. याचा फायदा भारतातील कोरोना विषाणूचा कहर कमी करण्यासाठी झाला.

केंब्रिज विद्यापीठाने केलेले हे संशोधन 11 सप्टेंबर रोजी प्लस वनने प्रकाशित केले आहे. ज्यानंतर भारत सरकारने देखील यास पाहिले आहे. अहवालानुसार, ‘कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यात पंतप्रधानांचे कार्यालय आघाडीवर होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतत संवाद साधल्यामुळे लोकांनी कोरोना विषाणूला गंभीरपणे घेतले.’ संशोधनात असे म्हटले आहे की पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनामुळेच 130 कोटी लोकांना काटेकोरपणे लॉकडाऊनचे अनुसरण करता आले आणि सामाजिक अंतराचे महत्व समजून घेता येऊ शकले. याशिवाय पीएमओने तयार केलेला पीएम केअर्स फंडही त्यांच्या आवाहनानंतर लोकांच्या मदतीने भरला गेला.

यावेळी लोकांना जागरूक करण्यासाठी सोशल मीडिया आणि टीव्ही माध्यमांचा मोठा पाठिंबा घेण्यात आला. कोरोना संकटाच्या मध्यभागी उद्भवणारे आर्थिक संकट लक्षात घेता पंप्रधानांनी लोकांशी संवाद साधला, प्रत्येक विभागातील व्यावसायिकांशी चर्चा केली. इतकेच नव्हे तर पंतप्रधानांनी सर्वांना आपल्या कर्मचार्‍यांचे पगार कपात न करण्यास सांगितले, ज्याचा मोठा परिणाम झाला.

प्लस वनने आपल्या अहवालात म्हटले आहे की मार्चच्या सुरूवातीस भारताने कठोर नियमांची अंमलबजावणी सुरू केली, तर दुसरीकडे चाचण्या वाढविण्यात येत होत्या. जेव्हा लॉकडाऊन आले तेव्हा भारतात पीपीई किट्स, सॅनिटायझर्स आणि मास्क यासारख्या गोष्टी बनविल्या जात होत्या. तसेच याआधीही जगातील बर्‍याच एजन्सी आणि वृत्तपत्रांचा असा विश्वास आहे की सर्वात कठोर लॉकडाऊन भारतात होते, ज्याचे पालन भारताने केले. लॉकडाऊनमुळे भारतात 25 लाखांहून कमी कोरोना प्रकरणे असल्याचा दावाही भारत सरकारने केला आहे.