भाजपच्या खासदारांना PM नरेंद्र मोदींनी दिले ‘हे’ टार्गेट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील गावांना स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने जनजागृतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना येत्या ऑक्टोबर महिन्यात दररोज १५ कि. मी. अंतर स्वतःच्या मतदारसंघात पदयात्रा काढण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे. एका बैठकीत पंतप्रधानांनी भाजपच्या सर्व खासदारांना महात्मा गांधी जयंतीपासून सरदार पटेल जयंतीपर्यंत आपापल्या मतदारसंघात पदयात्रा काढण्याची सूचना केली असून आपआपल्या मतदारसंघात या पदयात्रेद्वारे १५० किमी अंतर कापावे असेही बजावले आहे.

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार भाजपचे सर्व खासदार २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पदयात्रा करतील, असे त्यांनी सांगितले. लोकसभेसोबतच भाजपचे राज्यसभेतील सदस्यही पदयात्रेवर जाणार आहेत. ज्या मतदारसंघात भाजप कमकुवत आहे, अशा मतदारसंघात या खासदारांना पाठवण्यात येईल, असे जोशी म्हणाले. गावांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने जनजागर करण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार असून प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघात या पदयात्रेद्वारे १५० कि.मी. अंतर कापावे, असेही सांगण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर