Coronavirus : ‘कोरोना’ विरोधातील लढाईत PM मोदी ‘अ‍ॅक्शन’ मूडमध्ये, औषध कंपन्यांनसाठी 14 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या तपासणीसाठी लागणार्‍या किटची सरकारला गरज असून त्याची युद्ध पातळीवर निर्मिती करा असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरला आहे. त्यांनी देशातल्या औषध निर्मात्या कंपन्यांच्या प्रमुखांसोबत संवाद साधला. औषध निर्माण करणार्‍या कंपन्यांनी यात पूर्ण क्षमतेने मदत करावी, सरकार त्यांना लागेल ती मदत करायला तयार आहे. सरकारने यासाठी 14 हजार कोटींच्या मदत पॅकेजची घोषणा केल्याचे त्यांनी सांगितले.

मार्केटमध्ये जास्तित जास्त औषधे कशी उपलब्ध होतील त्याकडे लक्ष द्या. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी इनोव्हेटीव्ह पद्धतीने संशोधन करण्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या भितीमुळे शहरांमध्ये राहणार्‍या तरुणांनी आता घराची वाट धरली आहे. नवी दिल्ली, मुंबई, पुणे या शहरांमध्ये रोजगारासाठी इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर तरुण आलेले आहेत. कोरोनाचे सावट आणि लॉकडाऊनची भिती यामुळे त्यांनी गावी परतण्याची निर्णय घेतला. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली असून त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भिती निर्माण झालीय. हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराकडे जाणार्‍या सर्वांना प्रवास न करता ज्या शहरांमध्ये आहात तिथेच थांबण्याची विनंती केली आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भिती आहे. त्याचबरोबर तुमच्या गावीही धोका वाढतो. यामुळे तुमचे आई वडिलही चिंतेत पडतील त्यामुळे जिथे आहात तिथेच राहा अशी विनंती त्यांनी केली आहे.