95 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीला मोदींनी उपमुख्यमंत्री का केलं ? : रविश कुमार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील राजकारणात विधानसभा निवडणुकांपासूनच दररोज एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्री बनले. महाराष्ट्रात घडलेल्या या अनपेक्षित राजकीय घटनेने महाराष्ट्रातील जनता आश्चर्यचकित झाली आहे. यावरून हिंदी मीडियाचे नामवंत पत्रकार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते रविश कुमार यांनी ब्लॉग लिहून मोदींवर निशाणा साधला आहे. 95 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीला मोदींनी उपमुख्यमंत्री का केलं ? नॅचरली करप्शन पार्टीचे आमदार आता तुम्हाला सोबत कसे चालतात, ते आमदार आता प्रामाणिक झाले का? असा सवालही रविश यांनी विचारला आहे.

रविशकुमार यांच्या ब्लॉगमधील प्रमुख मुद्दे –
22 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी खटला दाखल केला. त्यामध्ये 70 जणांना आरोपी करण्यात आले असून अजित पवार त्यापैकीच एक आहेत. त्याच, अजित पवारांचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी केलं आहे. आता, याप्रकरणात ईडी हात टाकण्याची हिंमत करेल का ?

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानांनी 95 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीच्या नावामागे जी लावून त्यांस उपमुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, नॅचरली करप्शन पार्टीचे आमदार आता तुम्हाला सोबत कसे चालतात, ते आमदार आता प्रामाणिक झाले का? असा सवालही रविश यांनी विचारला आहे.

ज्या देवेंद्र फडणवीसांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उचलून महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:ची प्रतिमा उंचावली, ओळख निर्माण केली. त्याच अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनविण्यात आलं आहे. गेल्या वर्षीच भाजपा सरकारच्यावतीने अँटी करप्शन ब्युरोने अजित पवारांविरुद्ध उच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल करत त्यांना मुख्य आरोपी बनवले आहे. म्हणजेच, संकटसमयी अजित पवार आपल्या कामी यावेत, यासाठीच त्यांच्यावर टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. कारण, याप्रकरणी अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.

95 हजार कोटींच्या भ्रष्टाचारी अजित पवार यांना एका रात्रीत कुठूनतरी उचलून थेट राज्यपालांसमोर आणले जाते. त्यानंतर, देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते.

ईडीपासून वाचविण्याच्या अटीवरच हे सगळं केलंय का ? असेही रविश यांनी म्हटले आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानांनी 95 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीच्या नावामागे जी लावून त्यांस उपमुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, नॅचरली करप्शन पार्टीचे आमदार आता तुम्हाला सोबत कसे चालतात, ते आमदार आता प्रामाणिक झाले का? असा सवालही रविश यांनी विचारला आहे.

Visit : Policenama.com