PMC Abhay Yojana Scheme | अभय योजनेतून महापालिकेच्या तिजोरीत 144.35 कोटींचा मिळकत कर जमा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Abhay Yojana Scheme | शहरातील थकबाकीदारांसाठी (Outstanding) जाहीर केलेल्या अभय योजनेतून पुणे महापालिकेला दोन महिन्यात 144.35 कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2021 ते 3 मार्च 2022 अखेर नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांसह 8 लाख 88 हजार मिळकतधारकांनी 1606.18 कोटी रुपये मिळकत कर जमा केला आहे. पालिका हद्दीमध्ये 11 लाख 62 हजार एवढ्या मिळकती आहेत. त्यापैकी अभय योजनेंतर्गत (PMC Abhay Yojana Scheme) 66 हजार 454 थकबाकीदारांनी कर जमा केला आहेत. तर 458 मिळकती सील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे (PMC Taxation and Tax Collection Department) सह आयुक्त विलास कानडे (Joint Commissioner Vilas Kanade) यांनी दिली.

 

पुणे महापालिका Pune Municipal Corporation (PMC) हद्दीतील अनेक मिळकतधारकांनी वेगवेगळ्या कारणांमुळे मिळकत कर (Property Tax) भरला नसल्याने त्यांच्यावर 2 टक्के शास्ती कर लावण्यात आला होता. ही शास्ती दरमहा 2 टक्के असल्याने ती वाढत जावून थकबाकीची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी स्थायी समितीने (Standing Committee) अभय योजना राबवली (PMC Abhay Yojana Scheme) होती. ही योजना 7 जानेवारी ते 26 जानेवारी 2022 या कालावधीत राबवण्यात आली. त्यानंतर या योजनेला 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2022 अशी मुदतवाढ देण्यात आली होती.

महापालिकेच्या अभय योजनेंतर्गत अंदाजे 42 हजार 400 मिळकतींना भेटी देण्यात आल्या असून 66 हजार 500 थकबाकीदारांनी
महापालिकेच्या तिजोरीत 144.35 कोटी एवढा मिळकत कर जमा केला आहे.
तर 64.68 कोटी रुपयांची सवलत देण्यात आली. तसेच 4 हजार 436 बिगर निवासी मिळकती सील करण्यात आल्या आहे.
या मिळकतधारकांकडे 178.59 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी काही जणांनी कराचा भरणा केला आहे.

 

नागरिकांना मालमत्ता कर भरणे सुलभ व्हावे यासाठी शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी तसेच सणांच्या दिवशी देखील नागरी सुविधा केंद्र सुरु ठेवण्यात आली होती.
महापालिकेने राबवलेल्या अभय योजनेत ज्यांनी कर भरणा केला नाही. अशा थकबाकीदारांवर 1 मार्च पासून 2 टक्के शास्ती लावण्यात आला आहे.

 

 

Web Title :- PMC Abhay Yojana Scheme | 144.35 crore property tax collected from Abhay Yojana

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी बंपर गुड न्यूज ! 31 मार्चपासून 90,000 रुपयांपर्यंत वाढेल सॅलरी, 3% वाढेल महागाई भत्ता

 

Administrator In Pune Municipal Corporation (PMC) | 15 मार्च पासून पुणे महापालिकेचा कारभार ‘प्रशासका’च्या हाती

 

PM Modi Visit To Pune Corporation | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये ‘तू तू मैं मैं’