PMC Draft ward Structure | 34 गावांचा समावेश आणि त्रिसदस्यीय प्रभागामुळे अनेक विद्यमान ‘डेंजर झोन’ मध्ये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Draft ward Structure | पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) २०२२ मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रारूप प्रभाग रचना (PMC Draft ward Structure) हरकती व सूचनांसाठी आज रात्री जाहीर करण्यात आली. नव्याने समाविष्ट झालेली ३४ गावांचा समावेश आणि अस्तित्वातील चार सदस्यीय प्रभाग रचनेची मोठ्याप्रमाणावर तोडफोड झाल्याने निवडणुकी अगोदरच ‘विद्यमान’ नगरसेवकांपैकी (PMC Corporators) अनेकांना एकतर पक्षांतर करणे, प्रभाग बदलणे अथवा घरी बसावे लागणार असे दिसून येत आहे. नवीन प्रभाग रचनेचा सर्वाधीक फटका सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना (BJP Corporators) मोठ्याप्रमाणावर बसणार असल्याचे दिसून येत आहे.

 

पुणे महापालिकेने ५७ त्रिसदस्यीय आणि एक द्विसदस्यीय अशा ५८ प्रभागांच्या हद्दीची चतु:सीमा, नकाशे आणि प्रभागांच्या नावांची यादी आज जाहीर केली आहे. महापालिकेमध्ये मागील चार वर्षांत ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे महापालिकेची भौगोलिक हद्द विस्तारली असून मतदारसंख्याही वाढली आहे. मागील निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाल्या होत्या, तर यंदाची निवडणुक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याने बहुतांश प्रभागांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली आहे. (PMC Draft ward Structure)

 

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 – प्रारूप प्रभाग नकाशा

पुणे मनपाच्या वेबसाईटवरील लिंक – https://www.pmc.gov.in/mr/pmc-prabhag-rachna-2022

 

मागील निवडणुकीमध्ये १६२ नगरसेवकांच्या संख्येमध्ये सत्ताधारी भाजप- रिपाइं (BJP-RPI) आघाडीचे ९९ नगरसेवक निवडूण आले . विशेष असे की बहुतांश प्रभागात चारही नगरसेवक भाजपचेच (BJP) आहेत. तर केवळ दोन प्रभागांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) चार नगरसेवक आहेत. त्यामुळे नव्या रचनेत प्रभागांची तोडफोड झाल्याचा सर्वाधिक फटका हा भाजप नगरसेवकांनाच बसणार आहे. दुसरीकडे यंदा राज्यातील महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) राष्ट्रवादी (NCP), कॉंग्रेस (Congress) आणि शिवसेनेने (Shivsena) आघाडीमध्ये निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर कॉंग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने स्वबळाचा नारा दिला आहे. परंतू तूर्तास तरी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि कॉंग्रेसचे प्रत्येकी दहा- दहाच नगरसेवक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास महाविकास आघाडीतील विद्यमान नगरसेवक सेफ राहीले तरी उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक उमेदवार पक्षांतर अथवा बंडखोरी होण्याची शक्यताही मोठ्याप्रमाणावर आहे. त्यामुळे नवीन प्रभाग रचनेचा विद्यमान नगरसेवकांना तितकासा फटका बसला नाही तरी महाविकास आघाडीतील दुसर्‍या फळी कोलमडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

अशी असेल प्रभाग रचना

1. धानोरी-विश्रांतवाडी (Dhanori-Vishrantwadi) – मतदार 55488

2. टिंगरेनगर-संजय पार्क (Tingre Nagar-Sanjay Park) – मतदार 56969

3. लोहगाव- विमान नगर (Lohgaon- Viman Nagar) – मतदार 61836

4. वाघोली -इऑन आयटी पार्क (Wagholi – Ion IT Park) – मतदार 58912

5. खराडी-चंदननगर (Kharadi-Chandan Nagar) – मतदार 67367

6. वडगावशेरी (Wadgaon Sheri) – मतदार 60110

7. कल्याणी नगर-नागपूर चाळ (Kalyaninagar-Nagpur Chawl) – मतदार 67739

8. कळस-फुलेनगर (Kalas-Phulenagar) – मतदार 62273

9. येरवडा (Yerawada) – मतदार 71390

10. शिवाजीनगर गावठाण-संगमवाडी (Shivajinagar Gaothan-Sangamwadi) – मतदार 62481

11. बोपोडी-पुणे विद्यापीठ (Bopodi-Pune University) – मतदार 57861

12. औंध-बालेवाडी (Aundh-Balewadi) – मतदार 62050

13. बाणेर-सुस म्हाळुंगे (Baner-Sus Mahalunge) – मतदार 37589

14. पाषाण- बावधन बुद्रुक (Pashan- Bavadhan Budruk) – मतदार 58515

15. पंचवटी – गोखलेनगर (Panchavati – Gokhalenagar) – मतदार 67821

16. फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे (Fergusson College – Erandwane) – मतदार 67103

17. शनिवार पेठ- राजेंद्रनगर (Shaniwar Peth- Rajendra Nagar) – मतदार 67951

18. शनिवार वाडा – कसबा पेठ (Shaniwar Wada – Kasba Peth) – मतदार 67701

19. रास्ता पेठ-के.ई.एम. हॉस्पिटल (Rasta Peth-KEM Hospital) – मतदार 58994

20. पुणे स्टेशन- ताडीवाला रोड (Pune Station – Tadiwala Road) – मतदार 67129

21. मुंढवा-घोरपडी (Mundhwa-Ghorpadi) – मतदार 67574

22. मांजरी-शेवाळवाडी (Manjari-Shewalwadi) – मतदार 61878

23. साडेसतरानळी- आकाशवाणी (Sadesatranali- Akashwani) – मतदार 55659

24. मगरपट्टा- साधना विद्यालय (Magarpatta- Sadhana Vidyalaya) – मतदार 56446

25. हडपसर गावठाण-सातववाडी (Hadapsar Gaothan-Satavwadi) – मतदार 55782

26. भीम नगर-रामटेकडी (Bhimnagar-Ramtekdi) – मतदार 67721

27. कासेवाडी-हरकानगर (Kasewadi-Harkanagar) – मतदार 68501

28. महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट (Mahatma Phule Smarak – Timber Market) – मतदार 57483

29. खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई (Khadakmal Aali – Mahatma Phule Mandai) – मतदार 67592

30. जयभवानी नगर – केळेवाडी (Jayabhavani Nagar – Kelewadi) – मतदार 60237

31. कोथरुड गावठाण -शिवतीर्थ नगर (Kothrud Gaothan – Shivtirtha Nagar) – मतदार 61115

32. भुसारी कॉलनी-सुतारदरा (Bhusari Colony-Sutardara) – मतदार 67127

33. बावधन खुर्द-महात्मा सोसायटी (Bavadhan Khurd-Mahatma Society) – मतदार 66216

34. वारजे-कोंढवे धावडे (Warje-Kondhve Dhavade) – मतदार 64919

 

 

35. रामनगर-उत्तमनगर शिवणे (Ramnagar-Uttamnagar shivne) – मतदार 67422

36. कर्वेनगर (Karvenagar) – मतदार 67260

37. जनता वसाहत-दत्तवाडी (Janata Vasahat-Dattawadi) – मतदार 67332

38. शिवदर्शन-पद्मावती (Shivdarshan-Padmavati) – मतदार 66561

39. मार्केटयार्ड-महर्षी नगर (Market Yard-Maharshi Nagar) – मतदार 59580

40. गंगाधाम-सॅलिसबरी पार्क (Gangadham-Salisbury Park) – मतदार 59882

41. कोंढवा खुर्द – मिठानगर (Kondhwa Khurd – Mithanagar) – मतदार 55825

42. सय्यदनगर-लुल्लानगर (Sayyadnagar-Lulla Nagar) – मतदार 54026

43. वानवडी-कौसरबाग (Wanwadi-Kausar Bagh)- मतदार 59414

44. काळेपडळ-ससाणेनगर (Kale Padal-Sasane Nagar) – मतदार 55287

45. फुरसुंगी (Fursungi) – मतदार 55957

46. मोहम्मदवाडी-उरुळी देवाची (Mohammadwadi-Uruli Devachi) – मतदार 55047

47. कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी (Kondhwa Budruk – Yewalewadi) – मतदार 55662

48. अप्पर सुपर इंदिरानगर (Upper Super Indiranagar) – मतदार 56884

49. बालाजी नगर – के के मार्केट (Balaji Nagar – KK Market) – मतदार 58027

50. सहकारनगर-तळजाई (Sahakar Nagar-Taljai) – मतदार 62398

51. वडगाव-पाचगाव पर्वती (Wadgaon-Pachgaon Parvati) – मतदार 67289

52. नांदेड सिटी-सनसिटी (Nanded City-Sun City) – मतदार 66626

53. खडकवासला-नऱ्हे (Khadakwasla-Narhe) – मतदार 63525

54. धायरी- आंबेगाव (Dhayari- Ambegaon) – मतदार 58447

55. धनकवडी-आंबेगाव पठार (Dhankawadi-Ambegaon Pathar) – मतदार 57719

56. चैतन्यनगर-भारती विद्यापीठ (Chaitanyanagar-Bharati Vidyapeeth) – मतदार 56327

57. सुखसागर नगर-राजीव गांधी नगर (Sukhsagar Nagar-Rajiv Gandhi Nagar) – मतदार 55971

58. कात्रज-गोकुळनगर (Katraj-Gokulnagar) – मतदार 57847

 

 

Web Title :- PMC Draft ward Structure | The inclusion of 34 villages in pune corporation and three-member wards is danger zones for many existing corporators

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

7th pay commission | 2022 ची सर्वात मोठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात 14 टक्के वाढीची घोषणा

Pune ACP Transfer | पुण्यातील 3 सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या; ACP आरती बनसोडे आणि रमेश गलांडे यांचा समावेश

PMC Draft ward Structure | पुणे महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेच्या 58 प्रभागांची नावे