PMGKAY | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 80 कोटी लोकांना सप्टेंबरपर्यंत मिळणार 5 किलो मोफत रेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PMGKAY | मोदी सरकार (Modi Government) ने मोफत अन्नधान्य वितरण कार्यक्रम प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) म्हणजेच PMGKAY या वर्षी सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत (Modi Cabinet Meeting) हा निर्णय घेण्यात आला.

 

अन्न आणि पुरवठा मंत्री पीयूष गोयल (Food and Supplies Minister Piyush Goyal) या निर्णयाची माहिती देताना म्हणाले की, सरकारने मोफत अन्नधान्य वितरण योजनेचा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे.

 

 

31 मार्च रोजी संपत होती योजना
2020 पासून केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत रेशन दिले जात आहे. मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीला ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु नंतर ती 30 नोव्हेंबर 2021 आणि 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती.

सबसिडीच्या धान्याव्यतिरिक्त, दिले जाते मोफत रेशन
PMGKAY अंतर्गत, 80 कोटींहून अधिक लोकांना दरमहा 5 किलो धान्य दिले जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) 80 कोटी रेशनकार्ड धारकांना (Ration Card Holders) मोफत रेशनसाठी निवडण्यात आले आहे. त्यांना रेशन दुकानांमधून वितरीत करण्यात येणार्‍या अनुदानित धान्याव्यतिरिक्त मोफत रेशन दिले जाते.

 

रेशनकार्ड धारकांपर्यंतच मर्यादित योजना
पीएमजीकेएवाय अंतर्गत मोफत अन्नधान्याचा लाभ ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना मिळणार नाही.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही रेशनकार्ड धारकांपुरती मर्यादित आहे, म्हणजेच देशातील ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड आहे,
त्यांना त्यांचा रेशनचा कोटा तसेच या योजनेअंतर्गत अतिरिक्त रेशन मिळत आहे.

 

Web Title :- PMGKAY | pradhan mantri garib kalyan anna yojana pmgkay extended for 6 months till september 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | ‘राष्ट्रवादी-शिवसेना माझा घातपात करणार असल्याचं एसपीच बोलले’; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

 

Pune Crime | पुणे-मुंबई महामार्गावर अवैध मळी टँकरवर कारवाई, 23 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त

 

Modi Government | गरीबांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता 30 सप्टेंबरपर्यंत घेवू शकतात ‘या’ योजनेचा लाभ