पीएमपीएमएल बस प्रवासात तरुणाचे पाकिट चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात पीएमपीएमएल बसमधील चोऱ्यांचे सत्र काही केल्या थांबत नसून या घटना रोखण्यात पोलीसांना सपशेल अपयश येत आहे. महिलांना लक्ष करणाऱ्या चोरट्यांनी आता तरुणाच्या खिशातील पाकिट चोरले आहे. त्याच्याजवळील 42 हजार रुपयांचा ऐवज नेला आहे. पुणे स्टेशन ते पिंपरी प्रवासादरम्यान घडली.

याप्रकरणी शिवपूजन सिंग (वय ४३, रा. शेवाळेवाडी) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग पिंपरीमध्ये एका खासगी कंपनीत कामाला असून ते काल सकाळी आठ वाजता पीएमपीएमएल बसने पुणे स्टेशन ते पिंपरी असा प्रवास करीत होते. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या खिशातील पाकिट चोरुन रोख दीड हजार रुपये लंपास केले. तसेच पाकिटातील डेबीट आणि क्रेडीट कार्ड विविध दुकानांमध्ये स्वाईप करुन ४२ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस नाईक पिसाळ अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –